मुंबई : चेहरा बघून त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखणं किंवा चेहऱ्यातूनच तो व्यक्ती ओळखता येतो हे काही असंच म्हटलं जात नाही. एखाद्या व्यक्तीचा चेहरा बघून आपण त्याच्याबद्दल बरंच काही जाणू शकतो. समुद्र शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून त्याचा स्वभाव, त्याचं व्यक्तिमत्व तसेच त्याचं भविष्य देखील आपण ओळखू शकतो. जाणून घेऊया चेहऱ्यावरून त्या व्यक्तीच नशिब कसं असेल. 


चेहऱ्यावरून ओळखा कशी व्यक्ती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुंद किंवा चौकोनी चेहरा असलेले लोक: रुंद चेहरा असलेले लोक मनाने खरे आणि बोलण्यात स्पष्टवक्ते असतात. हे लोक भावनिकही असतात पण त्यांच्यात नेतृत्वगुण चांगला असतो. हे लोक बुद्धिमान असतात आणि प्रत्येक समस्येवर उपाय शोधतात. असे म्हणता येईल की हे लोक खूप भाग्यवान आहेत.


गोल चेहऱ्याचे लोक: हे लोक खूप भाग्यवान असतात. त्यांना आयुष्यात सर्वकाही सहज मिळते. हे लोक आनंदी आणि उत्साही असतात. हे लोक नेहमी खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात. स्वतःला खूप प्रामाणिक भागीदार असल्याचे सिद्ध करतात.


 


पातळ चेहऱ्याचे लोक: पातळ चेहऱ्याचे लोक अतिशय व्यवस्थित जीवन जगतात. जर कोणी त्रास दिला तर त्यांना राग येतो. असे म्हणता येईल की हे लोक स्वभावाने थोडे चिडखोर आणि नकारात्मक असतात. ते अनेकदा काळजीत बुडलेले असतात. पाठिंब्याशिवाय हे लोक यश मिळवू शकत नाहीत.


लांब चेहरा असलेले लोक : लांब चेहऱ्याचे लोक थोडे हट्टी आणि अहंकारी असतात. हे लोक नेहमी प्रेमाच्या शोधात असतात आणि प्रत्येक परिस्थितीत स्वतःला चांगले सिद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात असते.


अंडाकृती चेहरा असलेले लोक: सौंदर्याबद्दल बोलायचे तर, अंडाकृती चेहरा असलेले लोक सर्वात सुंदर मानले जातात. हे लोक आकर्षक आणि संतुलित असतात. हे लोक जीवनात अनेक यश मिळवतात आणि ते खूप सर्जनशील देखील असतात. त्यांना नवीन मित्र बनवणे आवडते. या लोकांना खूप लोकप्रियता मिळते.